
विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जात असला तरी डाळिंब (Pomegranate) उत्पादनामुळे देश-विदेशात येथे विशेष ओळख आहे. मात्र, अनाधिकृत डाळिंब व्यापारामुळे वाहतूक कोंडी, परप्रांतीयांचा वाढता प्रभाव, गुन्हेगारी आणि मक्तेदारी यांसारख्या समस्या वाढत असल्याने प्रशासनाने आता कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.(Pomegranate)
तहसीलदार संतोष कणसे, मुख्याधिकारी सुधीर गवळी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, चेअरमन समाधान पाटील, सचिव, आरोग्य अधिकारी, सहाय्यक निबंधक, मनसे जिल्हाउध्यक्ष विनोद बाबर, माजी नगरसेवक, व सदस्य यांच्या उपस्थितीत अनधिकृत डाळिंब व्यापार आठ दिवसांत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचे नुकसान टाळून, अधिकृत मार्केट यार्डमध्ये लिलाव होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.(Pomegranate)
तहसीलदार संतोष कणसे म्हणाले, अवैध प्रकारे होणाऱ्या डाळिंबाच्या (Pomegranate) व्यापार,शेतकऱ्यांचे नुकसान न होता अनधिकृत व्यापारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मार्केट यार्ड कमिटीच्या नेतृत्वात आठ दिवसात समिती नेमून पोलीस बंदोबस्तात जनजागृती करून मार्केट कमिटीमध्ये लिलावासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल परंतु जे व्यापारी अनाधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.(Pomegranate)
मुख्याधिकारी सुधीर गवळी म्हणाले, अनधिकृत व्यवसायामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापाऱ्यांनी येऊन तेथे लिलाव करावा जर असे होत नसेल तर अनाधिकृत व्यवसायावर कारवाई केली जाईल. (Pomegranate)
पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणारा दर याबाबत सर्वांनी कसं शेतकऱ्यांना दर दिला जाईल आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त नफा होईल यावर सर्वांनी काम केले पाहिजे. तसेच परप्रांतीय व परराज्यातून येणारी वाहतूक तसेच सांगोला शहरात वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांना महिलांना होणारा नाहक त्रास जे कोणी देत असतील अशांनी तो तात्काळ बंद करावा. पोलीस प्रशासनाकडून अवैद्य धंद्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहरामध्ये शांतता सुव्यवस्था राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. (Pomegranate)
विनोद बाबर मनसे जिल्हाउध्यक्ष म्हणाले, सांगोल्यातील अनधिकृत व्यवसायावर आम्ही वारंवार आवाज उठवला असून जर हा व्यवसाय आठ दिवसात बंद होत नसेल तर त्याला मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा अनधिकृत व्यवसाय बंद होणे गरजेचे आहे. 15 ऑगस्टला आम्ही आंदोलन करणार आहोत हे आंदोलन जोपर्यंत अनाधिकृत व्यवसाय व्यापार बंद होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील असे विनोद बाबर म्हणाले.(Pomegranate)
समाधान पाटील म्हणाले, सांगोला शहरातील अवैध्य डाळिंब लीलावाबाबत मार्केट यार्डची एक कमिटी स्थापन करण्यात येत असून सर्वांचे मत परिवर्तन करण्यात येईल. परंतु आठ दिवसानंतर अनाधिकृत व्यवसायांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार अनाधिकृत डाळिंब व्यापार हा मार्केट यार्ड येथे सुरू करून अनाधिकृत बंद करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. (Pomegranate)