
Sangola Police
सांगोला : सांगोला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत शहराच्या मध्यवर्ती भागातून तब्बल ४ लाख ८३ हजार ६६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ८३ हजार ६६३ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच ४ लाख रुपये किमतीची इको कार यांचा समावेश आहे. ही कारवाई धनगर गल्ली येथे करण्यात आली.(Sangola Police)
याप्रकरणी साठा मालक यास ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Sangola Police)
धनगर गल्लीतील एका पत्र्याच्या बंद खोलीत गुप्तपणे गुटखा साठवून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांच्या पथकाने ही धाड टाकली. या पथकात पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, मच्छिंद्र राजगे, पोलिस नाईक बाबासाहेब पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी, मारुती पांढरे, अमर पाटील, मच्छिंद्र माळी आणि संतोष चव्हाण यांचा समावेश होता. (Sangola Police)
छाप्यात गुटख्यासह इको कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Sangola Police)