
विशेष प्रतिनिधी : मरणयातना सोसायच्या किती? मृत्यूनंतरही वेदनादायी प्रवास करावा लागतोय? सांगोला तालुक्यातील हतीद गावातील दफनभूमीत जाण्यासाठी ४-५ फूट पाण्यातून प्रवास. मृत्यूनंतरही ग्रामस्थांच्या वाट्याला त्रास येत आहे. दफनभूमीत जाण्यासाठी ४ ते ५ फूट खोल पाण्यातून मार्ग काढावा लागत जावे लागते. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अंत्यविधी करण्यासाठी अशा वेदनादायी परिस्थितीतून जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील दफनभूमी नदीच्या पश्चिमेस आहे. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे बॅकवॉटर दफनभूमीच्या बाजूला साचते आणि पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे मृतदेह नेताना नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते. पाणी वाढल्यास मृतदेह ट्रॅक्टर , जीसिबीमधून नेण्याची वेळ येते.
ग्रामस्थांनी अनेकदा नदीवरून पलीकडे जाण्यासाठी पूल उभारण्याची मागणी केली आहे, परंतु प्रशासन मात्र गप्प आहे असे ग्रामस्थांनी संगितले.