
सांगोला : सांगोला तालुक्यातील गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तालुक्यातील विविध गणपती मंडळांच्या जागांची पाहणी केली. या वेळी त्यांनी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मंडळांनी सण शांततेत, सुरक्षिततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. (Sangola Police)
निरीक्षक घुगे यांनी ध्वनीप्रदूषण नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, सजावट, मंडळ परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यावर भर दिला. तसेच पोलिस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळेल, परंतु नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. (Sangola Police)
सण आनंददायी व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.(Sangola Police)