
सांगोला : लोकशाही विचारांचे प्रणेते आणि तमाम कष्टकऱ्यांचे प्रेरणास्थान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सांगोला शहरात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. शहरात भव्य मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.(Annabhau Sathe Jayanti )
नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मुख्य चौक व मिरवणूक मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगोला शहरात मोठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मिरवणूक शांतात आणि शिस्तबद्ध पार पडली असून नागरिकांनी यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. येणाऱ्या काळात सण सुरु होत आहेत नागरिकांनी असेच सहकार्य करावे. जे कोणी शिस्त मोडतील त्यांनी गय केली जाणार नाही, असे पो.नी.विनोद घुगे म्हणाले. (Annabhau Sathe Jayanti )