
विशेष वृत्त : समाजात काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की त्यांची प्रतिमा केवळ त्यांच्यापुरती मर्यादित न राहता ती पिढ्यानपिढ्यांची प्रेरणा देत राहते. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख(Dr Ganpatraoji Deshmukh) सांगोला तालूक्यातील नव्हे तर राज्यातील अशीच एक तेजस्वी, निर्व्याज आणि असामान्य लोकांचे आबा होते. ज्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. भाई गणपतरावजी देशमुख (Dr Ganpatraoji Deshmukh) यांची आठवण आली की पहिल्यांदा एक खंत वाटते की, इतक्या वेळा भेट, संवाद, परंतु त्यांची साधी राहणीमान उच्च विचार यामुळे ते कायम मनात घर करून राहतात. असे हे आबा साधे, प्रामाणिक आज या जगात भेटत नाहीत. आणि त्याच्या जाण्यानंतर तीच खंत आता बोचतेय.
मुंबईच्या विधीमंडळात डॉ. भाई गणपतरावजी देशमुख(Dr Ganpatraoji Deshmukh) यांचा आवाज नेहमीच गरजला. त्याचं नाव सांगितल्यावर काम करणारे अधिकारी कोणताही विचार न करता प्रथम ते काम करत एवढा त्यांचा धाक. परंतु याला धाक म्हणता येणार नाही कारण सर्वजन त्यांना आदर करत होते यामुळेच ते होत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप प्रत्येकाच्या मनात अजूनही ताजी आहे.
डॉ. भाई गणपतरावजी देशमुख (Dr Ganpatraoji Deshmukh) याचं व्यक्तिमत्त्व साधं, पण असामान्य होतं. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून ते पायी चालत असत. कार्यकर्ते नाहीत, चमचमाट नाही, गाड्या नाहीत. ही होती त्यांच्या साधेपणाची आणि तत्त्वनिष्ठेची कमाल.
विधानसभेतील त्यांची उपस्थिती म्हणजे अनुभवाची आणि शहाणपणाची शिदोरी. तब्बल ५५ वर्षं राजकारणात ११ वेळा आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते! हे आकडे फक्त रेकॉर्ड नाहीत. ही त्यांच्या कामगिरीची, जनतेच्या विश्वासाची आणि त्यांच्या तत्वांवरील निष्ठेची पावती होती.
त्यांच्या भाषणात ठामपणा होता, कधीच आरडाओरडा नव्हता. शांतपणे विधानसभेत उभं राहून ते मुद्देसूद बोलायचे, आणि क्षणात सभागृह शांत व्हायचं. कोणताही राजकीय पक्ष असो, सत्ताधारी असो वा विरोधक डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांना सार्वजन ‘भीष्म पितामह’ म्हणत असत. परंतु ते असे असताना सत्तेच्या मोहात कधी गुंतले नाहीत, न शोभा केली, ना स्वतःच्या भूमिकांपासून कधी मागे हटले.
विशेष म्हणजे त्यांनी कधीच सभागृहाची शिस्त मोडली नाही. राजकारणाच्या रुबाबात न वावरता त्यांनी आपली लढाई तत्त्वांच्या आधारावर लढली.
त्यांचं प्रत्येक विधान हे अभ्यासपूर्ण, समर्पक आणि संवेदनशील असायचं. अभिभाषणात जी दिशा देणं आवश्यक होतं, ती राहून गेली आहे. ती मुख्यमंत्री भरून काढतील, अशी अपेक्षा आहे, अशी विधाने ते शांतपणे करायचे. कुठेही टोकाचा सूर नसे, पण ठामपणात कोणतीही तडजोडही त्यांनी केली नाही.
डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या राजकीय वाटचालीतून खूप काही शिकू शकतो. त्यांचा संयम, त्यांची आचारशुद्धता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही व्यवस्थेवरील त्यांचा असलेला विश्वास हे खरे पाठ शिकण्यासारखे आहेत.
त्यांच्या जाण्याने एक युग संपलं. आता फक्त आठवणी राहिल्या आहेत. पण त्यांच्या आठवणींसोबत जी खंत राहते ती म्हणजे देव हरवल्याची.
कदाचित हेच डॉ. भाई गणपतरावजी देशमुख (Dr Ganpatraoji Deshmukh) हेच खरे मोठेपण. त्यांच असणंच इतकं प्रभावी होतं की ते अजूनही आपल्यात असल्याचे भासवते.
आणि म्हणूनच
असे आबा पुन्हा होणे नाहीsss! (Dr Ganpatraoji Deshmukh)
इन पब्लिक न्यूज व सर्व टीमच्यावतीने स्व. मा. आमदार भाई डॉ. गणपतरावजी देशमुख आमच्या आबासाहेबांना चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन! (Dr Ganpatraoji Deshmukh)