
सांगोला/शुभम चव्हाण : सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे 22 गावांसाठी वरदायिनी असणारी व गेली 25 वर्षे मंजुरीच्या प्रतिक्षेत असणारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना म्हणजे पूर्वीची उजनी उपसा सिंचन योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे ना. डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री,जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडला.
सत्य परिस्थिती झाकून, अफवा सांगून नगरपालिकेकडून नागरीकांची शुद्ध फसवणूक!
सन 2000 साली 78.59 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती परंतु पुढील पाच वर्षे या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्याने 2005 साली प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती सन 2019 साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केला त्यांनी या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण शासनाकडून मंजूर करून घेतले व नव्याने 10 गावांचा या योजनेमध्ये समावेश करून एकूण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 22 गावांना या योजनेच्या दोन टीएमसी पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून 27 फेब्रुवारी 2024 रोजी 883.74 कोटी रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यास आमदार शहाजी बापू पाटील यांनी यश मिळवले.
यावेळी ना. जयकुमार गोरे, मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ना. धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, मा. आमदार शहाजी बापू पाटील, मा. आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या भागात आलेनंतर स्व. गणपतरावजी देशमुख यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही : ना.राधाकृष्ण विखे पाटील
ना.राधाकृष्ण विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाहिलं. त्याचाच परिणाम म्हणून आज ही उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली. हा कार्यक्रम पार पडतोय त्यांचाही खऱ्या अर्थाने आपण त्यांचे आभार मानलं पाहिजे. तसेच देशांमध्ये ज्यांनी झाडी डोंगर दाखवली असे आपले शहाजी बापू यांनी ध्येयवेढेपणाने दुष्काळमुक्तीचे स्वप्न पाहिले. त्यांच्या प्रयत्नातून ही योजना सुरू होती याचाही मला खूप आनंद होतोय.
सांगोला तालुक्यात आल्यानंतर दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्यांनी अविरत प्रयत्न केले असे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काही या भागातील जुनी जाणती मंडळ यांना असं वाटत होतं की, आमचा शेतकरी दुष्काळमुक्त झाला पाहिजे. त्यांनी सातत्याने राज्य, केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढे बोलताना ते म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी देणे हे परवडत नाही असं म्हणणाऱ्यांनी राज्यात अनेक वर्ष राज्य केलं, हे मी सांगण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. परंतु नुसतं बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात कामही करावा लागतात. सांगोला तालुक्यामध्ये या योजनेला फार वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि या योजनेचा त्यावेळी 73 कोटीची होती. आज जवळपास तो अंदाजपत्रकाप्रमाणे साडेआठशे कोटीची आहे. शहाजी बापूंचा सततचा पाठपुरावा आणि त्यांची भूमिका आणि या भागातील काही योजनांवर सांगोला तालुका हा पूर्णतः बागायत होईल.
पुढे बोलताना ते म्हणाले, बीडच्या प्रकरणांमध्ये आमच्या पक्षाचा हात आहे, असे सकाळी एक मनोरुग्ण म्हणत होता. परंतु मला वाटते राज्यामध्ये मनोरुग्णांची संख्या वाढत चालली आहे. वेड्याची इस्पितळे बांधावी लागणार आहेत, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. बापू विरोधकांनी काही करायचे ते करू द्या विरोधकांचा खरपूस समाचार तुम्ही घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सांगोला हा दुष्काळमुक्त करूया आणि याला कोणताही निधी कमी पडणार नाही असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
आबा तयारीतला गडी आहे, लोकसभेला माजी आबांसोबत पैज लागली होती आणि… : पालकमंत्री जयकुमार गोरे
जयकुमार गोरे यावेळी बोलताना असताना म्हणाले, आज 13 गावांच्या स्वप्नपूर्तीचा सुवर्ण दिन आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणारा आमचा शेतकरी आणि या शेतकऱ्यांचा हा दुष्काळ संपावा यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले ते शहाजी बापूंनी. या भागासाठी पिढ्यानपिढ्या संघर्ष करण्यात आला आणि संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे कार्याध्यक्ष म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांनी काम केलं होतं आणि त्यांच्याच सुपुत्राच्या हस्ते आज याचे उद्घाटन होते हा योगायोग आहे. ज्यांनी संघर्ष उभा केला आणि त्यांच्याच पुत्राकडून या संघर्षाला न्याय मिळाला ही आनंदाची बाब आहे. या भागाला पाणी आणण्यासाठी एक गडी हिंदूराव नाईक निंबाळकरांचा मुलगा दुसरा बाळासाहेब विखे पाटलांचा मुलगा आणि शहाजी बापू तुम्ही यासाठी प्रयत्न केले आणि हे सर्व मंडळी आज या मंचावर उपस्थित आहे हा मोठा योगायोग आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, या स्टेजवर दिपक आबा आहेत. तसं पाहिजे तर आबा तयारीतला गडी आहे. मागच्या लोकसभेला माजी आबांसोबत पैज लागली होती. आम्ही एक सोडून दोन पेज लावल्या. मी वाटल सांगोल्याच्या मातीतला गडी शब्दाला जागणारा असल परंतु बापू मला अजून दहा लाख मिळाले नाहीत. दरम्यान ते म्हणाले इथं आबा उधारी मागायला तुम्हाला बसवले आहे. या स्टेजवर आबा आणि बापू दोघंही आहेत आणि आज दोघेही घरी बसलेत. ‘तुलाही नाही मलाही नाही आणि घाल…’ म्हणत पुढे ते म्हणाले सत्ताही कायम कधीच नसते पण आपलं तयार झाले नातं हे आयुष्यभरासाठी आहे आणि बापू आपण सांगोल्यासाठी जे मागाल आणि जे मला शक्य आहे ते मी आपणाला देईल असा शब्द यावे त्यांनी दिला.
‘जब तक सुरज चांद रहेगा, तब तक बापू आपका नाम रहेगा’ : ना.रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
ना.रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले, बऱ्याच निवडणुका या पाण्याच्या प्रश्नावर झाल्या. बापू आपल्या दोघांची कारकीर्द अशी झाली की, आपण दिलेला शब्द,वचन खऱ्या अर्थाने पूर्ण केले. बापूंच नाव या सांगोलाच्या इतिहासामध्ये लिहिले जाईल.
‘जब तक सुरज चांद रहेगा, तब तक बापू आपका नाम रहेगा’. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही झटला, झिजला ज्यांच्यासाठी लढला ते म्हणजे सांगोला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण केला आहे. आपण अनेक वेळा जनतेला शब्द देतो पण जेव्हा तो शब्द पूर्ण होत असतो त्यावेळी आनंदाचा परमार्थ होतो. सांगोला तालुका म्हणले की दुष्काळी तालुका असं म्हणायचं. परंतु बापूंच्या काळात टेंभू, म्हैसाळ, उजनी याचं पाणी सांगोला द्यायचं असा ठराव झाला आणि या सांगोल्याच्या चारी दिशा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आमचा आहे. आज 300 कोटींची ही सुरुवात आहे परंतु या कामाला अजून दीड ते दोन हजार कोटी रुपये लागणार आहे आणि ही झालेली सुरुवात ही निर्विघ्नपणे सुरु राहो असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
राजकारणानी लोकांना जनता म्हणते हे तर…
पुढे बोलताना ते म्हणाले, सांगोलाच्या राजकारणाची गंमत सांगायची झाली तर साहेब तुमच्या हेलिकॉप्टरची आम्ही वाट बघत होतो. यादरम्यान बापूंनी त्यांचं घड्याळ काढून आबांना दिलं आणि माझ्याकडे बघितलं मी माझं घड्याळ काढून बापूंना दिलं आणि आबांनी त्यांचा चष्मा मला दिला आणि आम्ही सर्व उपाशी होतो म्हणून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या गाडीतला डबा काढून आम्हाला सगळ्यांना जेवायला दिलं याला सांगोल्याचं राजकारण म्हणायचं आणि हीच सांगोल्याची संस्कृती आहे जी कुठे महाराष्ट्रात बघायला मिळत नाही.
आम्ही चौघे एका गाडीत होतो यावेळी अशी चर्चा झाली की लोक काय म्हणतील. परंतु मी सगळ्यांना सांगितलं की लोकांना पण माहिती आहे निवडणूक झाली की हे सगळे राजकीय लोक एकत्र होतात जेऊ-खाऊ घालतात. स्वर्गीय आबासाहेबांनी ही परंपरा घालून ठेवली आहे आणि ती परंपरा सगळ्यांनी जपून ठेवली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो असे ना.रणजीतसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले.
तालुक्याच्या पाण्यासंदर्भातील योजना गेल्या पाच वर्षातच मार्गी लागल्या हे ज्योतिषाने सांगायची गरज नाही : मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील
मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यावेळी बोलताना म्हणाले, सांगोला तालुका हा दुष्काळ असून गेल्या 25 वर्षापासून आपण या पाण्याची वाट बघतोय टी ही उपसा सिंचन योजना आहे. सांगोल्याच्या इतिहासामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की, गेल्या पाच वर्षात या योजना मार्गी लागल्या आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, खऱ्या अर्थाने सांगोला तालुक्याच्या पाण्यासंदर्भातील योजना या गेल्या पाच वर्षातच मार्गी लागले आहेत आणि हे कोणत्या ज्योतिषाने सांगायची गरज नाही असं मला वाटतं. सांगोला तालुक्याचे बापू नेतृत्व करत असताना या विकासाच्या योजना मार्गी लागल्या आणि याचा पाठपुरावा सुद्धा बापूंनी त्याच जोमाने,ताकतीने केला आणि या ताकतीलाच आज यश मिळालं असे आबा म्हणाले.