
सांगोला/प्रतिनिधी : शाळांना सुरुवात होऊन काही महिने झाले असून, विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्यासाठी बसेसवर (School Bus) मोठ्या प्रमाणात अवलंबूनता आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने पालकांना देखील आवाहन केले आहे की, मुलांनी प्रवास करत असलेल्या बसचा (School Bus) फिटनेस व चालकाचे व्हेरिफिकेशन तपासावे, आणि काही शंका असल्यास तात्काळ शाळा किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सांगोला वाहतूक विभाग व पोलीस प्रशासन शाळेच्या बसचे फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक चालकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. जुन्या, नियमबाह्य व फिटनेस नसलेल्या वाहनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
चालकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार असून, गंभीर तक्रारी आढळल्यास संबंधित चालकाला कामावरून दूर करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेला त्यांच्या बसेसचे फिटनेस प्रमाणपत्र व चालकाचे पोलीस व्हेरिफिकेशनचे दस्तऐवज माहितीसाठी शाळेत ठेवावे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, शाळेच्या वाहनांमधील अपघात रोखण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी ही काळाची गरज असल्याचे माहिती दिली.