
टेंभुर्णी/प्रतिनिधी : १० वर्षीय मुलाचे हत्या प्रकरणाने सोलापूर हादरून गेले आहे.(Solapur Crime) कार्तिकचा मृतदेह काल अरण गावाजवळील कालव्यात आढळल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
मुलाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दगडाने गंभीर इजा केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू आहे. गावातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि परिसरातील संशयित व्यक्तींवर पोलिसांची नजर आहे. (Solapur Crime)
महत्त्वाच्या तपासाची दिशा:
- अपहरणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही
- आरोपीने पूर्वनियोजित कट रचला असण्याची शक्यता
- परिसरातील संशयित व्यक्तींची चौकशी सुरू
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Solapur Crime) लवकरच संशयित आरोपीचा शोध पूर्ण होण्याची शक्यता आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण माढा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.