
Mosambi Market
विशेष प्रतिनिधी : मोसंबी मार्केटने (Mosambi Market) यावर्षी आर्थिकदृष्ट्या एक निराशाजनक चित्र उभे केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी मोसंबी मार्केटची एकूण उलाढाल सुमारे ३० लाख रुपयांनी कमी झाल्याचे व्यापारी व शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
बाजारात आवक वाढली असली,(Mosambi Market) तरी विक्रीवर परिणाम झाल्याने उलाढाल कमी झाली आहे. मागणीतील घट, वाहतूक खर्च वाढणे, निर्यातीतील अडथळे आणि साठवणूक सुविधा अपुरी असणे या बाबी देखील उलाढालीवर परिणाम करत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
शेतकऱ्यांसह व्यापारी देखील यामुळे उधार व्यवहार किंवा तोटा होण्याच्या भीतीने साशंक आहेत. बाजार समितीने या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.