
सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर तालुक्यातील कुमठे गावात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सांत्वनपर भेट देत कै. संभाजी दत्तात्रय सिनगारे यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. 14 जुलै रोजी संभाजी सिनगारे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(DCM Ajit Pawar )

आजच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. त्यांनी दुःखद प्रसंगात कुटुंबाला ताकद देण्याचे आवाहन करत सहवेदना व्यक्त केली. त्यांच्या या भेटीमुळे सिनगारे कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (DCM Ajit Pawar)
