
मुंबई/विशेष प्रतिनिधी : भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. (Tesla ) अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) ने अखेर भारतात अधिकृत प्रवेश केला असून, 15 जुलै 2025 रोजी मुंबईत आपला पहिला शोरूम आणि अनुभव केंद्र (Experience Center) भव्य स्वरूपात सुरु केले आहे.

बीकेसी येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये उभारलेल्या या पहिल्या (Tesla ) शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेही उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतात आणि महाराष्ट्रात टेस्लाच्या आगमनाचे स्वागत करताना सांगितले, “हीच योग्य वेळ आणि योग्य जागा आहे. मुंबई ही फक्त भारताची आर्थिक राजधानी नाही, तर नाविन्य आणि उद्यमशीलतेचीही राजधानी आहे.”
Manisha Rani : मनिषा रानीच्या फोटोंचा धुमाकूळ;चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया ‘मानसूनमध्ये उकाडा’ की काय?
टेस्लाने सध्या भारतात मॉडेल Y (Model Y) SUV चे लॉन्चिंग केले असून, सध्यातरी CBU (Completely Built Unit) स्वरूपात म्हणजे संपूर्णपणे तयार झालेल्या गाड्या परदेशातून आयात करून विकल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या डिलिव्हरी सप्टेंबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत मुंबईतच पहिला स्टोर उघडला असला तरी, लवकरच दिल्लीसारख्या प्रमुख शहरात दुसरा शोरूम सुरू करण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत. टेस्लाचा भारतीय बाजारपेठेतील हा प्रवेश, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी नवा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.