
मनोरंजन डेस्क : सोनी एंटरटेनमेंट (Shilpa Shetty) टेलिव्हिजनवरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर’ चार वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दणक्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 19 जुलैपासून सुरू होणाऱ्या या नव्या पर्वात (चॅप्टर 5) अशा 12 असामान्य स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे, जे केवळ जबरदस्त डान्सर नाहीत तर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फॉलो होत आहेत. (Shilpa Shetty)
हे लहान कलाकार त्यांच्या व्हायरल डान्स मूव्ह्जमुळे इंटरनेटवर चर्चेत आले आहेत. मात्र आता त्यांना एका नव्या, मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. (Shilpa Shetty) लाईव्ह स्टेजवर परीक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकायचे आहे.
या नव्या पर्वाबद्दल अभिनेत्री आणि शोची परीक्षक शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) म्हणाली, “या प्रत्येकाची शैली खूप वेगळी आणि अष्टपैलू आहे. त्यांना प्रचंड आत्मविश्वास आणि सोशल मीडियावर चाहत्यांचा मोठा पाठिंबा आहे. ‘इंटरनेटने ज्यांना बनवले स्टार, आता सुपर डान्सरचा मंच बनवेल त्यांना सुपरस्टार’ या वाक्यातच या सीझनचं सार दडलेलं आहे.”
शिल्पा (Shilpa Shetty) पुढे म्हणाली, “मी स्वतः अनेकदा त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर पाहिले आहेत. त्यांचं लाईव्ह परफॉर्मन्स बघणं, एकमेकांशी स्पर्धा करताना पाहणं आणि अखेर एकाला सुपरस्टार होताना पाहणं हे अनुभवणं प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचक असेल. हा सीझन डान्सप्रेमींना नक्कीच आवडेल.”
यंदाच्या सुपर डान्सर चॅप्टर 5 चे परीक्षक पॅनल शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि मर्झी पेस्तनजी यांच्या जोडीने सजले आहे. निर्माते सांगतात की हा सीझन प्रेक्षकांना दमदार परफॉर्मन्स, वेगवेगळ्या डान्स शैली, उत्साह आणि ऊर्जा यांची खात्री देणारा ठरेल.