
PRO
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दीर्घकालीन जनसंपर्क अधिकारी (PRO) संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने राज्यातील राजकीय, प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. (PRO)
पत्रकारितेपासून शासकीय सेवेत प्रवास
संजय देशमुख (PRO) यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली होती. पुढे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात अधिकारी म्हणून प्रवेश केला. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी स्थानिक पत्रकारांशी अतिशय विश्वासाचं नातं तयार केलं. त्यांच्या मोकळ्या, समंजस आणि संवादप्रिय स्वभावामुळे पत्रकार व प्रशासकीय यंत्रणेत दुवा साधणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. (PRO)
उपमुख्यमंत्र्यांसोबत दीर्घकाळची जबाबदारी
संजय देशमुख मागील 15 वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. याआधी त्यांनी अनके मंत्री महोदय यांचे कार्यालयात विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणूनही काम पाहिले. आपल्या संयमित आणि व्यावसायिक कामकाजामुळे त्यांनी राजकीय व प्रशासकीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली.
अजित पवार यांची श्रद्धांजली
संजय देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणाले, “मागील १५ वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून अत्यंत विश्वासू, सखोल विचार करणारे आणि शब्दबद्ध करणारे संजय देशमुख यांनी माझ्याशी कार्यरत राहून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या निधनामुळे मी एक समर्पित सहकारी गमावला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी आणि माझे कुटुंब सहभागी आहोत.