
DCM Ajit Pawar
मुंबई : चीनमधून करचोरी करून कमी दर्जाच्या मनुकांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आयात केली जात आहे, ज्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आणि देशाच्या महसुलाला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. (DCM Ajit Pawar) उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून चीनमधून होणारी बेकायदेशीर मनुका आयात तात्काळ थांबवावी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला आळा घालण्यासाठी मनुकांच्या दरांना स्थिर ठेवण्याची आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील तसेच देशभरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. चीनमधून कमी दर्जाच्या मनुकांच्या बेकायदेशीर आयातीत वाढ झाली आहे. आयात शुल्क आणि करांची चोरी करून मोठ्या प्रमाणावर ही मनुका भारतात आणली जात आहे. या करचोरीमुळे सरकारच्या महसुलाला फटका बसत आहे आणि राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान होत आहे.
हंगामाच्या काळात होणाऱ्या या बेकायदेशीर आयातीमुळे देशांतर्गत उत्पादित मनुकांचे दर प्रतिकिलो १०० ते १२५ रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. (DCM Ajit Pawar) बेकायदेशीर आयात आणि विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जावी.
आयात केलेल्या मनुकांच्या गुणवत्तेची तपासणी आणि कर वसुली अचूक करण्यासाठी बंदर, विमानतळे आणि बाजारपेठांमध्ये तपासणी आणि कर वसुली यंत्रणा बळकट केली जावी. हंगामाच्या काळात मनुकांच्या बाजारभावाला स्थिरता यावी आणि शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानीला आळा बसावा यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलली जावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ, पुणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांची भेट घेऊन या मुद्द्याकडे त्यांचे लक्ष वेधले होते आणि या समस्येच्या निराकरणाची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला हे पत्र लिहिले आहे.