
Legislative Council
मुंबई : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये खराब जेवण दिल्याच्या कारणावरून (Legislative Council ) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणावर विधानपरिषदेत (Legislative Council) जोरदार चर्चा झाली.
संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. (Legislative Council) मात्र, त्यात खराब डाळ-भात आल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
या घटनेवरून विरोधी पक्षाचे नेते आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत (Legislative Council) सरकारवर टीका केली. “कर्मचाऱ्यांना मारता? हिंमत असेल तर मंत्र्याला मारा. अशा लोकांना पाठींबा देणार का? अशा आमदारांचे निलंबन करा,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
अनिल परब यांनी आमदार गायकवाड यांच्या कपड्यांवरूनही टीका केली. “एका आमदाराने कसं राहावं? बनियन-टॉवेलवर, लुंगीवर येतो. रस्त्यावर राहताय का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Legislative Council)
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.(Legislative Council) “मी या घटनेची माहिती घेतली आहे. भाजीला वास येत होता, असं सांगितलं जातं. पण त्यामुळे मारहाण करणं योग्य नाही. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे मारहाण करणं चुकीचं आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो,” असं फडणवीस म्हणाले.
तसंच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “सभापतींनी या प्रकरणात काय कारवाई करता येईल, याचा निर्णय घ्यावा. अनिल परबजी म्हणतात तसं – टॉवेलवर मारलं, किंवा कसंही मारलं, पण ते चुकीचंच आहे.”
या संपूर्ण प्रकारामुळे शिंदे गटाच्या आमदाराच्या वर्तनावर टीका सुरू झाली आहे, तर विधानपरिषदेत सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. घटना गंभीर मानली जात असून सभापतींकडून यावर निर्णय अपेक्षित आहे.