
Sangola Police
सांगोला : सांगोला तालुक्यातील जवळा गावाच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी (Sangola Police) एका इसमाच्या स्कूटीतून बेकायदेशीर परवानगीशिवाय देशी-विदेशी दारूची तस्करी पकडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका इसमाला अटक करून सुमारे ५३,८३५ रुपये किमतीचा मुद्देमाल दिनांक ५ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता जप्त केला आहे.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे (Sangola Police) यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सदाम रसुल नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोलिंग करत असताना मौजे जवळा येथे गोपनीय बातमीच्या आधारे ही कारवाई केली. यावेळी रस्त्याच्या कडेला एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची प्लेझर स्कूटी (MH13 BZ 5040) थांबवून उभी असलेली दिसली. संशय आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष स्कूटीची तपासणी केली असता, त्यामध्ये विविध देशी व विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत आरोपी सुरज चंद्रकांत सागर (वय २९, रा. माळवाडी, सांगोला) याला ताब्यात घेण्यात आले. (Sangola Police) चौकशीदरम्यान त्याने सदर दारू जवळा गावातील प्रमोद साळुंखे यांच्या वाईन शॉपमधून खरेदी केल्याचे सांगितले. जप्त केलेल्या मुद्देमालात ब्लेंडर्स प्राईड, रॉयल स्टॅग, डीएसपी ब्लॅक, ग्रीन लेबल, गोवा लेमन्स, बी-7 स्टर्लिंग रिझर्व्ह आदी ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे.
पोलीसांनी (Sangola Police) स्कूटीसह देशी-विदेशी दारूच्या एकूण ५३,८३५/- रुपये किमतीच्या बाटल्या जप्त करून, नमुन्याच्या बाटल्या वेगळ्या काढून पंचनाम्यानंतर माल पोलिस ठाण्यात जमा केला आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी चे कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.