
सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या (Underground sewerage) कामामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट प्रकारच्या विटांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. कामाच्या ठिकाणी पडलेल्या विटा पाहता त्या अत्यंत हलक्या प्रतीच्या असून, त्या विटांना पाणी मारताच (Underground sewerage) लगेच तुटण्याची शक्यता आहे.
संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेकडून शासनाच्या पैशांचा गैरवापर करत निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.(Underground sewerage) तसेच या कामाला पाणी ही मारत नसल्याचा आरोप काही नागरीक करत आहे.या कामासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी मंजूर केला असतानाही गुणवत्ता राखली जात नसल्याने स्थानिकांत नाराजी आहे.(Underground sewerage)
भुयारी गटारीच्या या कामाच्या ठिकाणी पडलेल्या विटा तपासून पाहिल्यानंतर त्या साधारण हातानेच तुटण्याच्या स्थितीत आहेत. एवढेच नव्हे तर पाणी शिंपडताच या विटा गळून पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या निकृष्ट साहित्यामुळे भविष्यात भुयारी गटारीसाठी बांधण्यात आलेल्या चेंबरला तडे जाण्याचा आणि गटारीचा उपयोग न होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कामाची गुणवत्ता तातडीने तपासावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि दर्जेदार साहित्य वापरण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.