
सांगोला : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे (Ashadhi Wari ) प्रस्तान करणाऱ्या वारकरी बांधव व भगिनींसाठी सांगोला येथील फॅबटेक फाउंडेशन च्या वतीने रेनकोट वाटप केले असल्याची माहिती फॅबटेक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.
काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या(Ashadhi Wari ) दिशेने पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना पावसाचा ञास होऊ नये यासाठी फॅबटेक फाउंडेशन सांगोला यांनी एक हजारांहून अधिक वारकरी बांधव व भगिनींना रेनकोट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. फॅबटेक फाउंडेशनच्या या उपक्रमांमुळे वारकऱ्यांना पावसातही सुखरूपपणे आपला प्रवास पुर्ण करता येणार आहे. या उपक्रमांचे वारकरी बंधु व भगिनींनी समाधान व्यक्त केले आहे.
Ashadhi Wari हा कार्यक्रम फॅबटेक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, फॅबटेक फाउंडेशनच्या संचालिका सुरेखा रूपनर, फॅबटेक फाउंडेशनचे संचालक डॉ. सुरज रूपनर, फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बॅकेचे संचालक अमरजीत पुजारी, फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, फॅबटेक पब्लिक स्कूलच्या संचालिका सारीका रूपनर, फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बॅकेचे डेपोटी सीईओ विजय तंडे, फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बॅकेच्या मॅनेजर मिरा इंगवले, सागर येलपले आदींसह फॅबटेक फाउंडेशन, फॅबटेक पब्लिक स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. Ashadhi Wari