
lokabhimukh patrkarita
सोलापूर : संपादक प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या (lokabhimukh patrkarita) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोलापूरमध्ये पार पडला. हेरिटेज गार्डन, गांधीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. धनंजय माने, दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे आणि ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (lokabhimukh patrkarita)
सुशीलकुमार शिंदे यांनी पुस्तकाचे कौतुक करताना म्हटले, “प्रशांत माने हे चिंतनशील पत्रकार आहेत.(lokabhimukh patrkarita) त्यांनी तीस वर्षांच्या अनुभवातून उपयुक्त आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा आदर्श या पुस्तकातून मांडला आहे. नव्या पत्रकारांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. पत्रकारांनी समाजासाठी उपयुक्त बातम्या देत लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत.”
ते पुढे म्हणाले, “सोलापूरला रंगाअण्णा वैद्य यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकारांचा वारसा लाभला आहे. पत्रकार प्रबोधन करणारा असावा. लोकशाहीत चिंतन आवश्यक आहे. विकास कामांना पुढे नेणे, लोकप्रतिनिधींना जबाबदार ठरवणे हे पत्रकारांचे काम आहे.”
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले, “बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्रातून लोकशिक्षण झाले. त्या परंपरेत पत्रकार प्रशांत माने यांनी तब्बल तीस वर्ष पत्रकारितेतून अनेक प्रश्न मांडले. महसूल खात्यातील अनियमिततेवर त्यांनी लेखन करून शासनाचे लक्ष वेधले. पत्रकार हेही चांगल्या बदलाचे माध्यम ठरू शकतात हे त्यांनी सिद्ध केले.”
ॲड. धनंजय माने यांनी सोलापूरच्या पत्रकारितेचा गौरवशाली इतिहास सांगताना म्हटले, “मार्शल लॉच्या काळातही येथील पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पत्रकारितेतून समाजातील विसंगतीवर बोट ठेवले पाहिजे.”
दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे यांनी या पुस्तकाचे कौतुक करताना म्हटले की, “लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाने दैनिक तरुण भारतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.”
स्वागताध्यक्ष राजा माने म्हणाले, “सोलापूरच्या पत्रकारितेचा आत्मा म्हणजे लोकाभिमुखता. डिजिटल युगातही पत्रकारितेची मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गंभीरे यांनी केले. आभार अक्षय माने यांनी मानले. विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.
‘लोकाभिमुख पत्रकारिता’ या पुस्तकात प्रशांत माने यांनी तीन दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव, महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे आणि राजकीय-सामाजिक नातेसंबंध यांचा छायाचित्रांसह सविस्तर आढावा दिला असून हे पुस्तक नवोदित पत्रकारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.