
Raj-Uddhav Thackeray
मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj-Uddhav Thackeray) पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. येत्या ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम सभागृहात त्यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याचे अधिकृत निमंत्रण जाहीर झाले आहे.
मराठी भाषेवर सक्तीच्या हिंदी धोरणाला दिलेल्या प्रतिकाराच्या यशानंतर या एकजूट विजयाचा जल्लोष करण्यासाठी हा मेळावा होत आहे. (Raj-Uddhav Thackeray) निमंत्रण पत्रिकेवर ठळकपणे “आवाज मराठीचा!” असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
पत्रिकेत मराठी बांधवांना उद्देशून म्हटले आहे:
“सरकारला नमवलं का? हो, नमवलं! कोणी? तुम्ही मराठी जनतेने! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष केला. आता हा विजय तुमचा आहे. आनंद साजरा करताना आम्ही आयोजक आहोत, जल्लोष तुम्ही करायचा. वाजत गाजत, गुलाल उधळत या!”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj-Uddhav Thackeray) यांच्या या एकत्रित आवाहनामुळे महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक मेळाव्याची राज्यभर चर्चा सुरु आहे.