
सांगोला : सांगोला तालुक्यात (Sangola Police) सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबद्धतेची कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी (Sangola Police) दिलेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील वासुद येथे राहणारा सचिन आनंदा केदार (वय 27) हा इसम विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर झोपडपट्टी क्षेत्रातील अवैध धंदे, हातभट्टीदार मद्यविक्री, अंमली पदार्थांची तस्करी, व्हिडिओ पायरेटिंग,दम देणे, लोकांना लुबाडणे, धमक्या देणे हा याचा व्यवसाय होता. तसेच अश्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांसोबत त्याचे संबंध होते.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांततेस धोका निर्माण होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने 1981 मधील एम.पी.डी.ए. कायदा कलम 3(1) नुसार त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश 27 जून 2025 रोजी दिले.
सांगोला पोलिसांनी सदर आदेशाची अंमलबजावणी करत 27 जून रोजी केदारला ताब्यात घेतले. 28 जून 2025 रोजी सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने कडक पोलीस बंदोबस्तात आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याला मध्यवर्ती कारागृह येथे हलवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक कारवाई करून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.