
ChatGP
विशेष वृत्त / तंत्रज्ञान : AI आल्यानंतर (ChatGP) आपलं काम खूप सोपं झालं असलं, तरी डोळे झाकून AI टूल्सवर विश्वास ठेवणं तुम्हाला अडचणीत टाकू शकतं. AI प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात तर तरबेज आहे, पण ChatGPT आणि इतर AI टूल्स नेहमी योग्य सल्ला देतात का? आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या ChatGPT काय, कोणत्याही AI टूलला विचारू नयेत, नाहीतर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते.
गुंतवणुकीबाबत सल्ला
जर तुम्ही शेअर बाजारात किंवा कुठेही गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि त्यासाठी ChatGPT कडून सल्ला घ्यायचा विचार करत असाल तर सावध व्हा. कारण AI चा सल्ला तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. गुंतवणुकीसारख्या बाबतीत AI चा सल्ला घेण्यापेक्षा स्वतः संशोधन करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं.
आरोग्यविषयक सल्ला
हो, ChatGPT किंवा इतर AI टूल्स तुमचे प्रश्न सोडवण्यात कुशल आहेत. पण याचा अर्थ असा नाही की डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी AI वर अवलंबून राहावं. AI कडून आरोग्यविषयक सल्ला घेणं धोकादायक ठरू शकतं. आजारी असाल तर केवळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका
फॅड किंवा ट्रेंड फॉलो करताना सावधगिरी बाळगा. काही काळापूर्वी Ghibli नावाचा ट्रेंड आला होता, आणि सगळे त्या ट्रेंडमध्ये स्वतःच्या खासगी फोटोंना ChatGPT वर अपलोड करू लागले. AI ने जरी तुम्हाला घिबली आर्टसारखा फोटो तयार करून दिला तरी त्यामध्ये तुम्ही तुमचा वैयक्तिक फोटो AI ला दिला. हा फोटो आज नसेल तर उद्या कुठेही वापरला जाऊ शकतो.
कुठे घेऊ शकता ChatGPT ची मदत?
ChatGPT ची मदत तुम्ही प्रवासाचा प्लान बनवायला, अभ्यासात मदत घेण्यासाठी, एखाद्या शहराची माहिती मिळवण्यासाठी किंवा तुमच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी करू शकता.