
cm Devendra Fadnavis
मुंबई : राज-उद्धव ठाकरे (Raj Thackeray Uddhav Thackeray) यांच्या हिंदीविरोधी भूमिकेवर उत्तर देताना (cm Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच बोट ठेवले आहे. “हिंदीचा प्रश्न विचारायचा असेल तर राज ठाकरे यांनी तो प्रथम उद्धव ठाकरेंनाच (Raj Thackeray Uddhav Thackeray) विचारावा,” असा टोला फडणवीसांनी लगावला.
पत्रकार परिषदेत फडणवीस (cm Devendra Fadnavis) म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, 2020 मध्ये शिक्षण धोरणासाठी रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. (Raj Thackeray Uddhav Thackeray) 18 सदस्यांच्या त्या समितीत उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडूनच हिंदी आणि इंग्रजी शिकवण्याची शिफारस करण्यात आली होती. शिवसेनेचे विकास कदम यांनी ही शिफारस केली होती. 2021 मध्ये हा अहवाल मंत्रिमंडळात ठेवला गेला आणि उद्धव ठाकरे यांनीच त्यावर सही केली.”
हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनावर फडणवीसांचे प्रत्युत्तर
फडणवीस (cm Devendra Fadnavis) म्हणाले की, “आज हिंदी सक्तीविरोधात जो आवाज उठतो आहे, तो आवाज खरा असेल तर प्रथम त्यांना विचारायला हवे की, ही शिफारस कुणाच्या काळात झाली. राज ठाकरे (Raj Thackeray Uddhav Thackeray) यांनी हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे.”
शासनाचे दोन्ही जीआर रद्द
हिंदी भाषा विषय सक्तीने लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर, त्रिभाषा सूत्रातील हिंदीच्या सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय (GR) रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही फडणवीसांनी (cm Devendra Fadnavis) दिली.