
सांगोला/विशेष प्रतिनिधी : जागतिक कडधान्य दिननिमीत्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष वनस्पतीशास्त्र विभाग सांगोला महाविद्यालय व वनस्पती शास्त्र विभाग गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. जागतिक कडधान्य दिनानिमित्त कडधान्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये कडधान्याची माहिती व त्यातून मिळणारे प्रथिने व इतर पोषक तत्त्वांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कडधान्यातून बनवण्यात आलेल्या पदार्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व विद्यार्थ्यांना त्यानिमित्ताने प्रथम पारितोषिक स्नेहल देवकते, व्दितीय काजल माने, तृतीय प्रणाली भटकर व उत्तेजनार्थ वैष्णवी शिंदे, श्रद्धा गायकवाड, प्रतिक्षा जामदार ,गौरी अवताडे, प्रणाली डोंगरे, माहेश्वरी सुतार यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण सौ लता कांबळे सौ तनुजा दौंडे यांनी पाहिले जागतिक कडधान्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पारंपारिक पदार्थ ऐवजी वेगळे काही पदार्थ करू शकतो. यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस सौ. लता कांबळे, सौ. तनुजा दौंडे, डॉ.सीमा गायकवाड यांनी वेगवेगळे पदार्थ कसे तयार करावेत व त्यातून आपणास कोणते आवश्यक घटक मिळतात यासंबंधी मार्गदर्शन केले व कडधान्यापासून खाद्यपदार्थ बनवून प्रत्यक्ष दाखवले. जागतिक कडधान्य दिनाच्या कार्यशाळेचे प्रस्ताविक डॉ. राम पवार (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख ) यांनी केले.
सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागाची ऐतिहासिक सहल!
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कडधान्यापासून आपणास प्रथिने व मिळतातच व पोषक तत्वे मिळून आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सदर कार्यशाळेस संस्थेचे संचालक मा. श्री. सुरेश फुले हे उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, मा. मारुती हाके, कु. पी.एस.कदम (डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला) तसेच प्रा. रोहित पवार, प्रा.एस.एस.कांबळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. रमेश टेंभूर्णे यांनी मानले.