
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या 151 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून दसरा चौक येथे श्री शाहू छत्रपती शिक्षण (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) संस्थेच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेची सुरुवात दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री राहुल पाटील, संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली.
शाहू महाराजांच्या (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) पुतळळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या शोभायात्रेत जवाहर हायस्कूल जवाहर नगरने अंधश्रद्धा निर्मूलनावर देखावा सादर केला. श्री साई स्कूल व ज्युनियर कॉलेजने छत्रपती शाहू महाराजांचे (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) बहुजन समाजासाठी शैक्षणिक कार्य यावर, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने कला आणि क्रीडा प्रेमी राजा यावर ,श्री शाहू आयटीआय यांनी औद्योगिक शाळा, वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने होमिओपॅथिक दवाखाना, शाहू छत्रपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या वतीने शाहू महाराज व औषध निर्माण मशीन, श्रीपतराव बोंद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने माणगाव परिषद यावर देखावे सादर करण्यात आले.

ही शोभायात्रा कोल्हापूर मधील सर्व प्रमुख मार्गावरून निघाली. (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) दसरा चौक येथील शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या परिसरातील छत्रपती शाहू महाराज व माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, राजर्षी शाहू छत्रपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. अतुल पाटकर, साई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील ,शाहू आयटीआयचे प्राचार्य श्री वागरे, जवाहर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पवार , श्री विठ्ठल आंबले,श्री रवींद्र भोसले, श्री मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, शिक्षक,प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. एन एस एस, एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केले व समता दिंडीमध्ये सहभागी झाले.

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शाहू महाराज यांना (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) जयंती दिवसानिमित्त प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण व बाळासाहेब इंगवले यांच्या हस्ते राजर्षींच्या अर्धपुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले .
श्री शाहू शिक्षण संस्था कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत डॉ.पांडुरंग पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पतसंस्थेचे सचिव पांडुरंग भंडारे, प्रसाद धावारे, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या(Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) जयंतीच्या दिनानिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतील सर्व विभागांमध्ये विविध उपक्रम राबवून शाहू विचाराचा जागर करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले.
Rajshri Chhatrapati Shahu Maharaj : लोकहिताचा राजा! राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा अद्वितीय वारसा