
Rajshri Chhatrapati Shahu Maharaj
विशेष वृत्त : भारताचा पहिला राजा ज्यांनी (Rajshri Chhatrapati Shahu Maharaj) गरिबांच्या मुलांसाठी मोफत वसतिगृहाची निर्मिती केली आणि म्हणूनच ते (Rajshri Chhatrapati Shahu Maharaj) “कोल्हापूर राज्य वस्तीगृहाचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. केवळ शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यांतही शाळा सुरू करून प्रत्येक गरीब मुलाला शिक्षणाचा हक्क दिला.
१९१७ सालीच लागू केला शिक्षणाचा सक्तीचा कायदा!
भारताने २००९ साली शिक्षणाचा अधिकार कायद्यात समावेश केला, तर (Rajshri Chhatrapati Shahu Maharaj) शाहू महाराजांनी तब्बल १९१७ सालीच आपल्या राज्यात शिक्षण सक्तीचे केले होते.
शेतकऱ्यांचे उद्धारक!
धरणे बांधली, मोफत बी-बियाणे दिले, बाजारपेठा स्थापन केल्या, शेतकऱ्यांना कारखानदार होण्यासाठी सहकार चळवळ उभी केली, कुलकर्णी पद रद्द करून पगारी तलाठींची निर्मिती केली. (Rajshri Chhatrapati Shahu Maharaj)
समाजसुधारणेचे अग्रदूत!
विधवा विवाह, आंतरजातीय विवाह कायदेशीर केले. सतीप्रथा, हुंडाप्रथा रद्द केल्या. दलित-पीडितांना न्याय देण्यासाठी पहिल्यांदाच ५०% आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पहिलवानांना, कलाकारांना आश्रय दिला.
राजश्री शाहू महाराज (Rajshri Chhatrapati Shahu Maharaj )– साक्षात लोककल्याणाचा राजा!