
Neha Dhupia
मनोरंजन डेस्क : आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत आपली छाप उमटवणारी अभिनेत्री नेहा धूपिया काही काळापासून चित्रपटांपासून लांब आहे. मात्र रिअॅलिटी शोजमधून आणि सोशल मीडियावरून त्या कायमच चर्चेत राहतात. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत नेहा धूपियाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
नेहाने सांगितले की, गरोदर असल्यामुळेच तिला एक रिअॅलिटी शोमधून रातोरात काढून टाकण्यात आले होते. या घटनेमुळे ती खूपच दुखावली गेल्याचे तिने म्हटले आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला भूमिकेसाठी कसा संघर्ष करावा लागला, कशा अडचणींचा सामना करावा लागला, याची आठवणही तिने या मुलाखतीत सांगितली आहे.
नेहा धूपियाने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विविध भूमिकांतून तिने आपली प्रतिभा सिध्द केली आहे. जरी सध्या ती मोठ्या पडद्यावर दिसत नसली, तरी सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिचे अस्तित्व कायम आहे. चाहत्यांना मात्र तिच्या दमदार कमबॅकची आतुरतेने प्रतीक्षा आहे.