
CBSE
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची मोठी संधी मिळणार आहे. सीबीएसईने (CBSE) या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे.
परीक्षा कधी होणार? (CBSE )
- पहिली परीक्षा: फेब्रुवारी २०२६
- निकाल जाहीर: एप्रिल २०२६
- दुसरी परीक्षा: मे २०२६
- निकाल जाहीर: जून २०२६
विद्यार्थ्यांना मे महिन्यात घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या परीक्षेत विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा अशा ३ विषयांमध्ये गुण वाढवण्याची संधी मिळणार आहे.(CBSE)
मूल्यांकन कसे होणार?
दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मात्र वर्षातून एकदाच होईल. सीबीएसईने (CBSE ) सांगितले आहे की या निर्णयाची अंमलबजावणी लगेच होणार नाही. नियमावली जाहीर केल्यानंतर नागरिकांच्या सूचना मागवल्या जातील, त्यानंतरच अंतिम नियम लागू होणार आहे.
विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होणार?
सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयानंतर शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तयारीचा ताण कसा कमी होईल, पालकांची भूमिका कशी असेल, या मुद्द्यांवर पुढील काळात चर्चा होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिलासा!
सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा वर्षातून दोनदा देण्याची लवचिकता मिळणार आहे, त्यामुळे तणाव कमी होईल अशी अपेक्षा आहे. नियमावली जाहीर झाल्यानंतरच या निर्णयाचा अंतिम उपयोग कसा होईल, हे स्पष्ट होईल.