
Pandharpur
पंढरपूर : आषाढी एकादशी पंढरपूर (Pandharpur) यात्रा निमित्त पंढरपुर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पंढरपूर (Pandharpur) व परिसरातील दारूबंदीचे वेळापत्रक :
04 जुलै ते 07 जुलै 2025
पंढरपूर (Pandharpur) शहरासह 5 किमी परिसरात देशी-विदेशी मद्यविक्री आणि ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहतील.
09 जुलै व 10 जुलै 2025
पंढरपूर (Pandharpur) शहरासह 5 किमी परिसरात सायंकाळी 5.00 पासून देशी-विदेशी मद्यविक्री व ताडी दुकाने बंद राहतील.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दारूबंदीचे वेळापत्रक :
- 30 जून 2025 – नातेपुते (पूर्ण दिवस बंद)
- 01 जुलै 2025 – माळशिरस, अकलूज (पूर्ण दिवस बंद)
- 02 जुलै 2025 – वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर (पूर्ण दिवस बंद)
- 03 जुलै 2025 – भंडीशेगाव, पिराची कुरोली (पूर्ण दिवस बंद)
- 04 जुलै 2025 – वाखरी (पूर्ण दिवस बंद)