देश- विदेशशैक्षणिक
CBSE Board Exam : CBSE बोर्ड परीक्षा आजपासून सुरू
विद्यार्थ्यांनी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा आजपासून (15 फेब्रुवारी 2025) सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळेवर पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण उशिरा पोहोचल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
परीक्षेसाठी कोणते कपडे घालावेत?
- नियमित (स्कूल) विद्यार्थ्यांसाठी शाळेची गणवेश अनिवार्य आहे.
- खाजगी (प्रायव्हेट) विद्यार्थ्यांना साधे आणि हलके कपडे घालण्याची परवानगी आहे.
- नियमित विद्यार्थ्यांनी एडमिट कार्ड आणि शाळेचा ओळखपत्र (ID) अनिवार्यपणे सोबत ठेवावा.
- एडमिट कार्डसह सरकारी ओळखपत्र (आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) बरोबर ठेवावे.
परीक्षा हॉलमध्ये ‘या’ वस्तू नेण्यास सक्त मनाई!
पुस्तके, कागदाचे तुकडे, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर, पेन ड्राइव्ह
- कॅल्क्युलेटर, मोबाइल, इअरफोन, ब्लूटूथ, स्मार्ट वॉच, कॅमेरा, पेजर, हेल्थ बँड
- जर कोणी या वस्तू सोबत आणताना सापडले, तर त्याला परीक्षेतून बाहेर काढले जाईल आणि दोन वर्षांसाठी परीक्षा देण्यास बंदी घातली जाऊ शकते.
विद्यार्थ्यांनी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे. इन पब्लिक न्यूजच्या वतीने सर्वाना परीक्षेसाठी शुभेच्छा!