
Ahmedabad Air India plane crash
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव तुकाराम पवार व आशा महादेव पवार या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोघंही लंडनमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी जात होते.
या अपघातात एकूण २४२ प्रवासी होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली असून हातीद गावात आणि सांगोला तालुक्यात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघं आपल्या मूळ गावी नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते.
दरम्यान, बदलापूर येथील एक तरुण जो एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता, त्याचाही अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
या अपघाताची चौकशी सुरु असून, नेमके कारण काय होते याचा तपास DGCA व संबंधित यंत्रणा करत आहेत. संपूर्ण देश या घटनेमुळे हादरून गेला आहे.
पवार कुटुंबीयांच्या आणि क्रू सदस्याच्या दुःखात In Public News सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.