
इन पब्लिक न्यूज
इन पब्लिक न्यूज/विशेष वृत्त : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमनानिमित्त सांगोल्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी सहभाग घेतला आणि जयभीमच्या घोषणांनी सांगोला नगरी दुमदुमून गेली.

इन पुब्लिक न्यूजशी बोलताना आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, अनेक वर्षापासून तालुक्यातील तमाम जनतेचे स्वप्न आज पूर्णत्वास जात आहे. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगभरात आपले कर्तृत्व, बुद्धिमत्ता आणि चातुर्याने लोकशाहीची घटना संपूर्ण जगाला दिली. आपल्या सांगोला तालुक्याला आणि मला विशेष आनंद वाटतो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये वकिली करत होते त्यावली सांगोल्यातल्या अनेक गोर-गरीब जनतेला त्यांनी मोफत स्वतःच्या वकिली व्यवसायातून न्याय मिळवून दिला आहे. सांगोलामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत. यामुळे सांगोलातील तमाम जनतेला होतोय आनंद होतोय. गेल्या अनेक वर्षाचं आमचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचे होते ते आज पूर्ण होत आहे. आज सांगोला तालुक्याची वाटचाल ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने होत आहे, असे मला वाटते.
पुढे बोलताना आबा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता या देशाचे राष्ट्रपती यांना निमंत्रित करण्याचा आमचा मानस आहे. आमचे हे स्वप्न पूर्ण होऊ अशी मी बुद्ध चरणी प्रार्थना करतो. तसेच माझ्याकडून या होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा देतो असे आबा म्हणाले.