पाकिस्तान सेना प्रमुख घाबरले सोशल मीडियाला !
पाकिस्तानी सेना फॉर्मेशन कमांडर्सच्या बैठकीत यावर विशेष चर्चा

इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांना सोशल मीडियाचा प्रचंड चरका बसला आहे. सोशल मीडियावरून लोकांच्या वाढत्या नाराजीला पाहता त्यांनी आता या प्लॅटफॉर्मवरील अभिव्यक्तीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे नवीन सोशल मीडिया कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.
सेना प्रमुखांची वाढली चिंता :
पाकिस्तानी जनतेकडून सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या संतापाने सैन्याची चिंता वाढली आहे. पाकिस्तानी सेना फॉर्मेशन कमांडर्सच्या बैठकीत यावर विशेष चर्चा करण्यात आली.
ISPR (Inter-Services Public Relations) ने याबाबत माहितीमहिनुसार, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजने सैन्याच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे सेना प्रमुखांचे म्हणणे आहे.
या घटनांवर झाली चर्चा :
- बैठकीत इस्लामाबादमध्ये SCO परिषदेच्या वेळी सुरक्षा कारणास्तव सैन्याला बोलावल्याच्या घटनेवरही चर्चा झाली.
- याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या फेक न्यूजने सेना प्रमुखांना अस्वस्थ केले आहे.
- इस्लामाबादच्या डीएमने सैन्य तैनातीसाठी अधिकृत चिठ्ठी पाठवली होती, पण सोशल मीडियावर ही घटना वेगळ्या पद्धतीने मांडली गेली.
केली कठोर कायद्यांची मागणी
सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सेना प्रमुखांनी शहबाज शरीफ सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत:
- नवीन सोशल मीडिया कायदा लागू करावा.
- फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर टाळण्यासाठी नियम कठोर करावेत.
लोकशाहीविरोधी भूमिकेची झलक
पाकिस्तानी सैन्य ज्याला कशाचाही धाक नाही, असे म्हणते, त्यांना आता जनतेच्या सोशल मीडियावरील विचारांमुळे अस्वस्थ व्हावे लागत आहे.
लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे मानले जाते, पण पाकिस्तानी सैन्य यावर बंधने आणून जनतेचा रोष दडपण्याचा प्रयत्न करत आहे असे एका वृत्तामध्ये समोर आले आहे.