
मनोरंजन डेस्क : बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री होती, जिच्या सौंदर्य आणि अभिनयावर चाहते अक्षरशः वेडे झाले होते. ‘त्रिदेव’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली ही ‘ओए-ओए गर्ल’, जिने आपल्या छोट्याशा करिअरमध्ये अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. मात्र १९८९ मधील ‘मिट्टी और सोना’ हा चित्रपट तिच्या मनाच्या सर्वाधिक जवळचा ठरला.
या चित्रपटात तिने कॉलेज गर्ल आणि तवायफ अशी दोन टोकाची पात्रं एकत्र साकारली होती. जी तिच्यासाठी खूपच आव्हानात्मक होती.
या चित्रपटाबद्दल अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही थ्रोबॅक फोटोज शेअर करत काही खास अनुभव सांगितले. तिने लिहिले की, ती फक्त १५-१६ वर्षांची असताना गुपचूप रेड लाइट एरियात जायची, केवळ आपल्या भूमिकेची जाणीव आणि ती भूमिका जगता यावी यासाठी.
सोनमने लिहिलं:
“मी तिथल्या मुलींबरोबर बोलायचे. त्यांच्या मनात असलेली भीती, वेदना आणि असुरक्षिततेचं भावनिक ओझं मला जाणवायचं. या भूमिकेसाठी रिसर्च करताना मला समजलं की पडद्यावर भूमिका साकारणं म्हणजे केवळ अभिनय नाही, ती एक संपूर्ण भावनिक यात्रा असते.”
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक असा प्रसंगही आला, जो सोनमसाठी अतिशय अवघड होता. तिला स्किन कलरची स्ट्रॅपलेस ड्रेस घालावी लागली, जी दिसायला अशी वाटत होती की जणू काही घातलंच नाहीये!
त्या क्षणी ती सुरुवातीला तयार होती, पण…
“शूट सुरू होण्याच्या आधी मी अक्षरश: फूटफूटून रडायला लागले,” असं तिने लिहिलं.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!