सांगोला /विशेष प्रतिनिधी : वाढेगाव नदीच्या पुढे कारमधील पेट्रोल संपल्याने कार रस्त्याच्या कडेला थांबली होती. पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकीवरून येणाऱ्या इसमाने एकाला जोराची धडक दिली. या घटनेमध्ये कारच्या बाहेरील थांबलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढेगाव-सांगोला रोडला नदीच्या पुढे कार पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या कडेला थांबली होती. कारमधील चालक पेट्रोल आणण्यास गेला असता कारमधील एक प्रवासी कारच्या बाहेर थांबला होता. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी स्वाराने जोराची इसमाला धडक दिली. यामध्ये तो जागीच ठार झाला. तर धडक देणारा दुचाकी वरील जखमी झाला असून तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे.
या प्रकरणाची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
