Titanic Film Facts : ५ वर्षाची मेहनत अन ऐतिहासिक कहाणी, ११ ऑस्कर प्राप्त

इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : 1997 साली ‘टायटॅनिक’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नाही तर भावनांची आणि इतिहासाची जगभरात आदरयुक्त आठवण आहे. या महाकाय चित्रपटासाठी दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी प्रचंड मेहनत घेतली. एका भयानक जहाज दुर्घटनेवर आधारित चित्रपट बनवणे, त्या काळाचा हुबेहूब सेट तयार करणे आणि त्या घटनेचे वास्तव पुन्हा साकारणे हे खूप मोठे आव्हान होते.
टायटॅनिकची ही आहे कहाणी
1912 साली 10 एप्रिल रोजी इंग्लंडमधून निघालेल्या आयएमएस टायटॅनिक कधीही परत न येण्यासाठी समुद्रात शेवटचा प्रवास केला. या भयंकर घटनेनंतर फक्त 26 दिवसांत यावर पहिला चित्रपट बनवण्यात आला होता. मात्र, तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची रिळे एका अपघातात जळून खाक झाली. परंतु 1997 मध्ये आलेल्या जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘टायटॅनिक’ चित्रपटाने हा इतिहास जागतिक प्रेक्षकांसमोर मांडला.
तब्बल 12 वेळा समुद्राच्या तळाशी केले निरीक्षण :
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जेम्स कॅमेरॉन यांनी तब्बल 12 वेळा समुद्राच्या तळाशी जाऊन बुडालेल्या टायटॅनिकचे निरीक्षण केले. तिथून परतल्यावर, त्याने आपल्या टीमसह अस्सल टायटॅनिकसारखाच सेट तयार केला.
- चित्रपटाचे बजेट:
टायटॅनिक हा त्या काळातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट होता. इतकेच नव्हे तर चित्रपटाचा खर्च प्रत्यक्ष टायटॅनिक जहाज तयार करण्याच्या खर्चापेक्षा अधिक होता. - सेट डिझाइन:
मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्नियामध्ये एक विशाल पाण्याच्या टाकीमध्ये जहाजाचा हुबेहूब प्रतिकृती सेट तयार करण्यात आला. सेट बनवण्यासाठी 40 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च करण्यात आला.
कलाकारांची मेहनत आणि थरारक अनुभव
चित्रपटातील कलाकार लिओनार्डो डि-कॅप्रिओ (जॅक) आणि केट विंसलेट (रोज) यांनी सुमारे तीन महिने कठोर प्रशिक्षण घेतले.
11 ऑस्कर जिंकणारा ऐतिहासिक चित्रपट
टायटॅनिकने 11 ऑस्कर पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणींचा समावेश होता. हा चित्रपट आजही इतिहासातील सर्वात महान आणि क्लासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो.
टायटॅनिक हा केवळ एक चित्रपट नव्हे, तर इतिहासाचा आणि मानवी जिद्दीचा अमर दस्तऐवज आहे.