देश- विदेश

अर्रर्र… येथे पर्यटकांना भाड्यानं मिळते “बायको”, ‘असा’ करतात करार

पर्यटकांना आनंद मिळण्यासाठी आणि त्यातून पैसे कमावण्यासाठी लग्न केले जात


इन पब्लिक न्यूज/ विशेष वृत्त :  एके काळी हा देश बहुसंख्य हिंदू राजांचा देश मानला जात होता. या देशात फक्त हिंदू राजेच राज्य करत होते. काही कालावधीनंतर काळ बदलला तसा येथील राजाने त्यांचा धर्म बदलला. या राजांनी दुसरा धर्म स्विकारला. तसेच येथील प्रजेने देखील धर्म बदलण्यास सुरुवात केली.

अलीकडे हा देश चर्चेत येत आहे आणि याचे कारण म्हणजे इथे एक नवी प्रथा सुरू करण्यात आली आहे. “आनंद विवाह अर्थात प्लेजर मॅरेज” ही लग्नाची नवी पद्धत आहे, ज्यामध्ये देशात पर्यटन करण्यासाठी आलेल्या पर्यटकासोबत १० ते १५ दिवसांसाठी लग्न लावून दिल जात,त्यानंतर लग्नाचा करार संपवला जातो. त्यानंतर पुन्हा नव्या पर्यटकासोबत लग्न करण्यात येत.

एक वृत्ताने दिलेल्या माहितीनूसार, या देशाच नाव इंडोनेशिया असून येथे दरवर्षी लाखों पर्यटक येतात. येथे महिला पर्यटकांसोबत दहा ते पंधरा दिवसांसाठी लग्न करतात, यालाच प्लेजर मॅरेज अर्थात आनंद विवाह असे नाव देण्यात आले.

काय ते नवच ! वॅलेंटाईन डेसाठी बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक..!

अशी प्रथा सुरु केली कारण ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील मुली पर्यटकांसोबत लग्न करतात. दहा ते पंधरा दिवसांसाठी हा करार करण्यात येतो. हा करार संपलेनंतर ते पुन्हा नव्या पर्यटकासोबत लग्न करतात. हे लग्न पर्यटकांना आनंद देते तसेच त्याच्या बदल्यात पैसे घेतले जातात. त्यामुळेच याला आनंद विवाह असे नाव देण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुताह निकाह नावाने ओळखणारी ही प्रथा आता देशात सर्वात जास्त पैसे कमावून देणारा नवा उद्योग बनला आहे.

असा केला जातो हा व्यवसाय?

पर्यटकांना आनंद मिळण्यासाठी आणि त्यातून पैसे कमावण्यासाठी लग्न केले जात. काही समाजात याला अस्थायी विवाह असे देखील म्हटले आहे. हा  व्यवसाय काही एजेंट करतात, त्यातील प्रत्येक एजेंट हा दर महिन्याला जवळपास २०- २५ तरी लग्न जमवतात. इंडोनेशियामध्ये हा बिझनेस सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे.            


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button