
विशेष आरोग्य वार्ता : एकेकाळी केवळ वयोवृद्धांमध्ये दिसणारा उच्च रक्तदाब (Hypertension) हा आजार आता लक्षणीय प्रमाणात तरुण पिढीला आपल्या विळख्यात घेऊ लागला आहे. २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत असल्याची चिंता आरोग्य तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
उच्च रक्तदाब हा अनेकदा “सायलेंट किलर” म्हणून ओळखला जातो, कारण सुरुवातीस याची कोणतीही ठोस लक्षणे दिसत नाहीत. मात्र, तो हृदयावर दीर्घकालीन दुष्परिणाम करत राहतो. परिणामी, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
काय आहेत कारणं?
- अनियमित आहार, फास्टफूड्स आणि सोडियमयुक्त पदार्थांचे अधिक सेवन
- शारीरिक हालचालींचा अभाव, सततचा ताण आणि व्यसनाधीनता
- लठ्ठपणा आणि झोपेचा अभाव हे देखील महत्त्वाचे घटक
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञांचे ‘स्मार्ट ६ टिप्स’
- नियमित तपासणी:
रक्तदाब १२०/८० मिमीएचजी पेक्षा जास्त असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. - मीठाचे प्रमाण कमी ठेवा:
प्रक्रिया केलेले पदार्थ आणि डबाबंद खाद्यपदार्थ टाळा. - नियमित व्यायाम:
आठवड्यातून किमान ५ दिवस ४५ मिनिटांची शारीरिक हालचाल आवश्यक आहे. - वजनावर नियंत्रण ठेवा:
लठ्ठपणा टाळल्यास हृदयाची झीज कमी होते. - संतुलित आहार:
ताज्या फळ-भाज्या, तृणधान्ये, आणि पुरेशी पाण्याची मात्रा घ्या.