
Odisha : एक धक्कादायक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. 13 वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेला रडत असलेली तीन दिवसांची अनाथ बाळंतीण एका महिलेने दत्तक घेतली होती. तिने त्या मुलीला आपली सख्खी मुलगी समजून अपार प्रेमाने, लाडाने वाढवलं. तिच्या आयुष्यात आनंद असावा म्हणून दिवस-रात्र कष्ट घेतले. मात्र, कधीच वाटलं नसेल की, तीच दत्तक मुलगी तिचा मृत्यू घेऊन येईल.
हत्येचा उलगडा कसा झाला?
सुरुवातीला मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं मानण्यात आलं. कारण ती पूर्वीपासून हृदयविकाराने त्रस्त होती. 29 एप्रिल रोजी तिच्या दत्तक मुलीने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. नंतर, ती बेशुद्ध होताच घरी बोलावून तिघांनी मिळून उशीने गळा दाबून हत्या केली.
नंतर तिला रुग्णालयात नेलं गेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मुलीने नातेवाईकांना आणि हॉस्पिटलला सांगितलं की आईचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. त्यामुळे कोणालाही संशय आला नाही.
इंस्टाग्रामवरून उघड झाला मर्डर प्लॅन
आरोपी तिचा भाऊ याला तिच्या मुलीचा मोबाईल फोन मिळाला, जो भुवनेश्वरमध्ये हरवला होता. मोबाईल तपासताना इंस्टाग्रामवर चॅटमध्ये हत्या आणि दागिन्यांची चर्चा आढळली. या चॅटमध्ये मुलीने रथ आणि आईच्या हत्येची आणि तिचे सोनं-रुपयांचे वाटपाची योजना आखली होती.
सोनं विकून कमावले 2.4 लाख रुपये
पोलिसांनी याबाबत माहिती दिली, हत्या करण्याआधी मुलीने काही दागिने ज्यांची 2.4 लाख रुपयांत विक्री झाली होती. पोलिसांनी 30 ग्रॅम सोने, 3 मोबाईल फोन्स आणि 2 उश्या जप्त केल्या आहेत, ज्यांचा वापर गुन्ह्यात झाल्याचा संशय आहे.
तिघेही आरोपी अटकेत
पोलिसांनी दत्तक मुलगी व इतर २ जणांना अटक केली असून, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.
एक आईने जीव लावलेली मुलगीच तिच्या मृत्यूचं कारण ठरावी, यासारखी शोकांतिका दुर्मीळच. हा प्रकार केवळ कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक धक्का आहे.