
सांगोला/अविनाश बनसोडे : तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार रवींद्र कांबळे यांनी तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांची लूट, प्रमाणपत्रांसाठी मनमानी शुल्क!
निवेदनात नमूद केल्यानुसार, जात, उत्पन्न, निवासी प्रमाणपत्र, तसेच सातबारा उतारे यांसाठी नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रांवर अवलंबून राहावे लागते.मात्र, केंद्र चालक वाजवीपेक्षा अधिक शुल्क आकारत आहेत आणि नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करत आहेत.
विद्यार्थ्यांना मोठा त्रास
वेळेत प्रमाणपत्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात मोठा अडथळा येत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकृत व वेळेत सेवा मिळण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बागायती शेतजमीन विक्रीस उपलब्ध
अन्यथा आंदोलनाचा इशारा सांगोला तहसील कार्यालय परिसरात शासकीय दराने सेवा मिळावी, नागरिकांची फसवणूक थांबावी आणि प्रमाणपत्र वेळेवर मिळावीत यासाठी सेतू सुविधा केंद्र सुरू करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बहुजन समाज क्रांती संघटनेने दिला आहे.
शिक्षकांचा पगार न दिल्याने हायकोर्टाचा दणका : जि.प.सीईओंचे वेतन स्थगित