
माळशिरस/प्रतिनिधी : सर्वत्र आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण… नववधूवर अक्षता पडल्या… आणि काही तासांतच काळाने तिची साथ सोडली. बाभुळगाव (ता. माळशिरस) येथे एका कुटुंबांमध्ये लग्नानंतर अवघ्या काही तासांत हृदयद्रावक घटना घडली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
१३ मे रोजी विवाह घोटी (ता. माढा) येथे मोठ्या थाटामाटात पार पडला होता. शुभमंगल सावधानच्या घोषणा, सनई-चौघड्यांचा गजर, आणि दोन्ही कुटुंबांचा हर्षोल्हास वातावरणात भर घालत होता.
पण दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरु झाल्या. तातडीने तिला अकलूजच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. मात्र, वाटेतच काळाने झडप घातली आणि नववधूने प्राण सोडले.

हसतमुख चेहऱ्याने घरात आलेली वधू… आणि काही तासांत अंत्ययात्रेची तयारी
या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवविवाहितेच्या अचानक निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. “जीवितात एकत्र येण्यासाठी जे लग्न होतं, तेच दुर्दैवानं शेवटचं ठरलं,”