Pooja Batra
Pooja Batra : श्वेता तिवारी ही आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते, पण एक अशी अभिनेत्री आहे जिने फिटनेसच्या बाबतीत श्वेतालाही मागे टाकलं आहे. या अभिनेत्रीचं वय ४८ वर्षं असलं तरी ती आजही २५ वर्षांच्या नायिकांप्रमाणेच ग्लॅमरस दिसते आणि ती म्हणजे पूजा बत्रा.
पूजा बत्राने १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया किताब जिंकून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती भारतातील आघाडीची सुपरमॉडेल झाली आणि १९९७ मध्ये ‘विरासत’ या हिट चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता पूजा बत्रा एक फिटनेस इन्फ्लुएंसर बनली आहे आणि तिचा फिटनेस इतका जबरदस्त आहे की त्याच्यापुढे श्वेताही फिक्की वाटते.
पूजाच्या फिटनेसचं गुपित म्हणजे ती शरीर, मन आणि त्वचेचं तितकंच लक्ष घेते. ती जिमला जाणं कधीही चुकवत नाही आणि नेहमीच हेल्दी डायेट फॉलो करते. योग, जिम व्यतिरिक्त ती खेळांनाही वर्कआउटचा भाग मानते. तिला गोल्फ खेळायला खूप आवडतं आणि दररोज ती त्यासाठी वेळ देते.
पूजा बत्रा तिचं मन स्थिर ठेवण्यासाठी आध्यात्माकडे वळते. ती देवावर विश्वास ठेवते. तिने आपल्या आईसोबत महाकुंभ २०२५ मध्ये स्नान केलं होतं. त्याआधी ती काशी नगरी वाराणसीतही गेली होती, जिथे तिने काल भैरव मंदिर आणि संकट मोचन हनुमान मंदिराला भेट दिली होती. तिने घाटावर योगसाधनाही केली होती.
पूजा बत्रा आजही तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसने चाहत्यांची मनं जिंकते.
