
सांगोला / प्रतिनिधी : मोबाईलचे थकलेले हप्ते भर का नाहीस, असा प्रश्न विचारल्याच्या कारणावरून एका व्यक्तीवर तणावात आल्याने नात्यातील तरुणाने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुन्हाडीच्या दांड्याने पाय आणि हातांवर मारहाण केली. ही घटना सांगोला तालुक्यातील महीम गावात संध्याकाळी ५ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , या फिर्यादीने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, तरुणा वर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या नात्यातील तरुणाकडून वापरासाठी आपल्या नावावर मोबाईल खरेदी करून दिला होता. त्याचे हप्तेही तेच भरत होते. मात्र, काही हप्ते थकलेले असल्याने फिर्यादीने विचारणा केली. त्यावरून रागावून तरुणाने शिवीगाळ केली व “मोबाइल तुझा, तू घेऊन जा,” असे म्हणत जबरदस्तीने हल्ला केला.
हल्ल्यात फिर्यादीच्या गळ्यावर मोबाईल चार्जरच्या वायरने आवळण्याचा प्रयत्न केला गेला, तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डाव्या पायावर व दोन्ही हातांवर वार करून तेथून पळून गेला, अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.