Baby John Trailer : सलमानचा ‘हा’ एक सीन संपूर्ण ट्रेलरवर भारी
फक्त 6 सेकंदांच्या कॅमिओमुळे सलमान खानने धमाल उडवून दिली
इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान कोणत्याही चित्रपटात चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार करतो. मग तो चित्रपटाचा मुख्य अभिनेता असो किंवा त्याचा छोटासा रोल, प्रेक्षकांना फक्त ‘भाईजान’ला पाहायचं असतं. आता सलमान खान बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे, आणि फक्त 6 सेकंदांच्या कॅमिओमुळे सलमान खानने धमाल उडवून दिली आहे.
ट्रेलर झाला रिलीज ; सर्वावर पडला भारी
चित्रपट ‘बेबी जॉन’ चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. फॅन्स या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता तो रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आले. ट्रेलरमध्ये सलमान खानची एक झलक शेवटी दाखवण्यात आली आहे. फक्त 6 सेकंदांचा हा सीन असूनही सलमान खानने संपूर्ण ट्रेलरवर आपली छाप पडली.
सलमान दिसला अॅक्शन मोडमध्ये :
ट्रेलरच्या शेवटच्या 6 सेकंदांमध्ये सलमान खान जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये दिसला. सलमानचा एकमेव सीन असला तरी त्याने ट्रेलरमधील संपूर्ण मेहफिल लुटली. या सीनमध्ये सलमान वरुण धवनला मदत करताना दिसतो, ज्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला आहे.
फक्त काही सेकंदांची भूमिका आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला :
फक्त काही सेकंदांच्या भूमिकेमुळेच सलमान खानने चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. वरुण धवनच्या चाहत्यांसोबतच भाईजानचे चाहतेही आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता मात्र ‘बेबी जॉन’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना कसा वाटेल, हे पाहणे रंजक ठरेल.