Bhojpuri Actress Monalisa
Bhojpuri Actress Monalisa : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या स्टायलिश अंदाजाची खास चर्चा असते. नुकतेच मोनालिसाने आपल्या इंस्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले असून, या फोटोंमुळे इंटरनेटवर अक्षरशः आग लागली आहे.
या लेटेस्ट फोटोंमध्ये मोनालिसाने वनपीस परिधान केलेली दिसत आहे. एका खास इव्हेंटमधील हे फोटो असून तिच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “नजर न लागो” अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
इंस्टाग्रामवर मोनालिसाची पोस्ट झाली व्हायरल
मोनालिसाने जवळपास 10 फोटो पोस्ट केले असून, त्याला कॅप्शन दिलं आहे, काल रात्री, हंगामा ओटीटीच्या ग्रँड सक्सेस पार्टीत… माझ्या नवीन सीरिज ‘जुड़वा जाल’ साठी मी खूपच उत्सुक आहे. लवकरच येत आहे हंगामा प्लेवर. ‘हसरतें’, ‘रात्रि के यात्री 2’ आणि ‘धप्पा’ या शोजना इतकं प्रेम दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांचे आभार.
