Malika Sherawat
Malika Sherawat : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मल्लिका शेरावत हिच वय आता ४८ वर्षं असलं तरी त्या अजूनही अतिशय यंग आणि ग्लॅमरस दिसतात. तीच हे सौंदर्य आणि फिटनेस पाहून तीच वय ओळखणं जवळपास अशक्य आहे. यामागे आहे तीच सीक्रेट फिटनेस ड्रिंक, ज्याचा खुलासा त्यांनी स्वतः सोशल मीडियावर केला आहे.

नैसर्गिक ऊर्जा मिळवण्यासाठी मल्लिकाने दिला फिटनेस मंत्र
मल्लिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती सकाळच्या वेळी एक पेय घेताना दिसते. यावेळी ती म्हणली, सर्वांना सुप्रभात! मी तुमच्यासोबत एक हेल्थ टिप शेअर करू इच्छिते. मी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी गुनगुने पाणी घेते आणि त्यात लिंबू पिळते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या साध्या सवयीने मिळते नैसर्गिक एनर्जी
मल्लिकाने सांगितले लिंबूपाणी पिण्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते आणि त्वचा उजळते. याशिवाय ती रोज नियमित व्यायाम, योग्य आहार आणि मानसिक शांततेवरही भर देते.
