अबब ! पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन : पाच दिवसांत 900 कोटींची कमाई
‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड धमाका

इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड धमाका करत आहे. 4 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत वर्ल्डवाइड 900 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचण्याचा पराक्रम केला आहे. वीकेंड संपल्यानंतरही चित्रपटाने आपली कमाई कायम ठेवत मंडेलाही दमदार कामगिरी केली.
मंडे टेस्टमध्ये असा केली दमदार कामगिरी
‘पुष्पा 2’ ने पाचव्या दिवशी भारतातून 64.1 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये:
- तेलुगु: 14 कोटी
- हिंदी: 46 कोटी
- तमिळ: 3 कोटी
- कन्नड: 0.5 कोटी
भारतामध्ये चित्रपटाचा एकूण नेट कलेक्शन 593.1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, हिंदी भाषेतून 331.7 कोटी रुपयांची कमाई झाली आहे, जी अन्य भाषांपेक्षा जास्त आहे.
पुष्पा 2 चा जागतिक स्तरावर
संपूर्ण पाच दिवसांत, तेलुगुमध्ये 211 कोटी, तमिळमध्ये 34.45 कोटी, कन्नडमध्ये 4.05 कोटी, आणि मल्याळममध्ये 11.2 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. वर्ल्डवाइड कलेक्शन 880 कोटींवर पोहोचले असून लवकरच चित्रपट 900 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे.
‘पुष्पा 2’ चा जलवा
पुष्पा 2 च्या तुफान यशामुळे सलमान खान, श्रद्धा कपूर यांसारख्या अनेक दिग्गज सुपरस्टार्सना बॉक्स ऑफिसवर मागे टाकावे लागले आहे. ‘पुष्पा 2’ चे हे यश अल्लू अर्जुनच्या अभिनय आणि चित्रपटाच्या मजबूत कथानकाचे उदाहरण ठरत आहे.
‘पुष्पा 2’ चा जलवा पाहता, हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.