मुंबई/प्रतिनिधी: मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि अलीकडेच तिने “Raid 2” या आगामी मराठी चित्रपटातील “Nasha” या रोमँटिक गाण्यावर एक खास रील शेअर केलं आहे. या व्हिडीओतील मानसीचा सोज्वळ पण मोहक अंदाज पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.
रील पोस्ट करताच काही तासांतच हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्सचा वर्षाव झाला. चाहत्यांनी तिच्या अभिनयासोबतच नृत्यशैलीचंही भरभरून कौतुक केलं. “Nasha” हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असून, मानसीचा रील त्याला अधिकच प्रसिद्धी मिळवून देतो आहे.
ग्लॅमरसोबत नृत्यकलेतही निष्णात
मानसी नाईक ही केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. “बघतोस काय मुजरा कर” मधील तिचं लावणीवरचं परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिलं. त्यानंतर “मर्डर मेस्त्री”, “झाला बोभाटा”, “हळद रूचकर” यांसारख्या चित्रपटांत तिने विविध भूमिका साकारल्या.
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
तिचा सहज आणि मोहक अभिनय, लावण्यपूर्ण नृत्यशैली, आणि सोशल मीडियावरील अॅक्टिव्ह प्रेझेन्स यामुळे मानसी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. तिचं सौंदर्य आणि स्टाईल काहींच्या मते जुन्या मराठी अभिनेत्रींची आठवण करून देणारी आहे. मानसीने 2021 मध्ये प्रीतम खरे यांच्याशी विवाह केला असून, वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे प्रत्येक रील आणि पोस्ट चाहत्यांसाठी एक ट्रीटच ठरतात
