मुंबई/प्रतिनिधी: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. ‘गुलकंद’ या आगामी चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सईने परिधान केलेली काळी साडी आणि डिझायनर ब्लाउज सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड होत आहे.

सई ताम्हणकर ही केवळ अभिनयातच नव्हे, तर फॅशनमधील सेन्ससाठी देखील ओळखली जाते. वेस्टर्न आउटफिट असो किंवा पारंपरिक साडी,सई प्रत्येक लूकमध्ये आपला ग्लॅमरस अंदाज दाखवत असते. तिच्या या नव्या लूकवर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.

एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट केली आहे, “फायर आहे फायर!” तर दुसऱ्याने लिहिलं, “साडीमध्ये इतकी हॉट कोणी दिसू शकतं?” अशा कमेंट्सचा पाऊस सईच्या पोस्टवर पडतोय.

‘गुलकंद’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेली सई तिच्या या लूकमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आली आहे. अभिनय, आत्मविश्वास

आणि फॅशन यांचा मेळ असलेल्या सई ताम्हणकरने आपल्या मेहनतीच्या जोरावर केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं ठसठशीत स्थान निर्माण केलं आहे.
